शेजारच्या कर्नाटकात लागले महाराष्ट्रापेक्षा स्वस्त पेट्रोलचे फलक

0

नाशिक, ता. १८ : नाशिकसह देशातील अनेक भागातील पेट्रोलच्या दरांनी प्रति लिटरला ८० रुपयांची मर्यादा ओलांडली असताना. शेजारच्या कर्नाटकमध्ये मात्र महाराष्ट्रापेक्षा ८ ते  ९ रुपयांनी स्वस्त मिळत आहे.‍

विशेष म्हणजे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील निपाणी येथील एका पेट्रोलपंपाने तर चक्क महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल ९ रुपयांनी स्वस्त असा फलकच झळकावला आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून हे छायाचित्र सोशल माध्यमांत झपाट्याने प्रसारित होत आहे.

कोल्हापूर शहरापासून जवळच कर्नाटकात असलेल्या निपाणी व बेळगाव येथील पेट्रोलचा दर ७१. ६१ रुपये प्रति लिटर असा आहे. तर डिझेलचे दर ५९.०४ प्रति लिटर असा आहे.

गोव्यातही पेट्रोलचे दर ७२. ७१, तर डिझेल ६१. ६४ रु. प्रति लिटर असे आहेत.

आज नाशिक येथील  पेट्रोलचे भाव ८० रुपये प्रतिलिटर इतके आहेत. तर मुंबई येथील पेट्रोलचे दर  ७९.६२ प्रति लिटर इतके आहेत.

कर्नाटकाप्रमाणेच शेजारच्या गुजरातमध्येही पेट्रोलचे दर ७२.५६ रु. प्रति लिटर इतके आहेत. म्हणजेच महाराष्ट्राच्या, त्यातही नाशिक आणि मुंबईच्या तुलनेत ७ ते ८ रुपये स्वस्त.

LEAVE A REPLY

*