नाशिकमध्ये आज पेट्रोल पोहोचले ८८ रुपयांवर

0

नाशिक, ता. ७ : डॉलरच्या तुलनेत घटलेला रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत सतत वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे इंधनाचे दर वाढत असून आज नाशिक शहरात पेट्रोल डिझेलचे दर उच्चांकी झाल्याचे दिसून आले.‍

आज शहरात पेट्रोलचे दर ८७.९३ अर्थातच ८८ रुपये आणि डिझेलचे दर ७५.९४ अर्थातच ७६ रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले.

गेल्या १५ दिवसांत नाशिक शहरातील पेट्रोलच्या दरात तब्बल २.३० रुपयांनी वाढ झाली असून डिझेलच्या दरात तब्बल ३.१० रुपयांनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात अतिरिक्त कर लागल्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर जास्त आहेत. गुजरातमध्ये पेट्रोलचे हेच १० रुपयांपेक्षा कमी आहेत.

नाशिक जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या गुजरात राज्यातील सापुतारा येथील इंधनाचे दर लिटरमागे तब्बल १० रुपयांनी कमी असल्याने अनेक परिसरातील अनेक वाहनचालक पेट्रोल भरायला गुजरात राज्यात जातात.

LEAVE A REPLY

*