.. तर डिझेल ५० रु. व पेट्रोल ५५ रु. प्रति लिटर मिळेल- नितीन गडकरी

0
छत्तीसगड – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी छत्तीसगड येथील चरोदामध्ये एका सभेला उपस्थित होते. तेथे सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, छत्तीसगडकडे मोठ्या प्रमाणावर जैवीक इंधन निर्माण करण्याची क्षमता आहे. पर्यायी इंधनाचा वापर केल्यामुळे आपण पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून राहणार नाहीत. देशात विविध ठिकाणी पेट्रोलिअम मंत्रालय इथेनॉलचे प्रकल्प सुरू करत असल्यामुळे डिझेल ५० रुपये तर पेट्रोल अवघ्या ५५ रुपये प्रति लिटर दराने मिळू शकेल, अशी माहिती केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी छत्तीसगडमधील दुर्ग येथे एका कार्यक्रमात भाषण देताना दिली आहे.

इथेनॉलचे देशातील ५ ठिकाणी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून लाकडाच्या वस्तू आणि कचऱ्यापासून यात इथेनॉल बनवले जाईल. जेथे याचा भाताचा पेंढा, गहुचा पेंढा, ऊस आणि मुन्सिपल वेस्ट यांच्यावर प्रक्रिया करून इंधन निर्माण केले जाईल. यामुळे डिझेल केवळ ५० रुपये आणि पेट्रोल केवळ ५५ रुपये प्रति लीटर दरात मिळेल, असे गडकरी यावेळी म्हणाले. सुमारे ८ लाख कोटी रूपयांचे डिझेल आणि पेट्रोल देशात आयात केले जाते.

LEAVE A REPLY

*