पेट्रोल, डिझेलच्या दरांत वाढ सुरूच

0
नवी दिल्ली – विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदनंतरही इंधन दरवाढ सुरूच आहे. मंगळवारी पेट्रोलच्या दरात 14 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत आज एक लिटर पेट्रोलसाठी 88.26 रुपये मोजावे लागत आहेत. डिझेलच्या दरांमध्येही 15 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलचा दर 77.47 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल परभणीत मिळत असून तेथील पेट्रोलचा दर ९०.५ व डिझेल ७८ रुपये प्रति लिटर आहे.

बंदच्या दिवशीही लिटरमागे पेट्रोल 23 पैशांनी तर डिझेल 22 पैशांनी महागले. ऑगस्टच्या मध्यापासून आतापर्यंत लिटरमागे पेट्रोलच्या दरात 3.65 रूपयांनी तर डिझेलच्या दरात 4.06 रूपयांनी वाढ झाली आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाच्या मुल्याने नीचांकी पातळी गाठण्याचे सत्रही कायम असल्याने कच्च्या इंधनाच्या आयातीसाठी जादा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे इंधन दरवाढ होत आहे.

LEAVE A REPLY

*