Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

पेट्रोल, डिझेल दरवाढ सुरूच

Share
नवी दिल्‍ली : रोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता हैरान झाली असतानाही इंधन दरवाढीची मालिका सुरुच आहे. पाच रूपयांची करकपात केल्‍यानंतही पेट्रोल आणि डिझेलचीदरवाढ सुरूच आहे. आज मुंबई आणि दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर २१ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रति लिटर ८७.५० रूपये झाले आहे. तर दिल्लीमध्ये प्रति लिटर पेट्रोल ८२.०३ रुपये झाले आहे तर, मुंबईमध्ये डिझेल प्रतिलिटर ३१ पैशांनी वाढले आहे. मुंबईमध्ये डिझेल आता ७७.३७ रूपये प्रति लिटर झाले आहे.
केंद्र आणि राज्य शासनाने इंधनाच्या दरात कपात केल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. डिझेलच्या दरांमध्ये शनिवारी आणखी काही पैशांची घट झाली, मात्र करकपात झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून पेट्रोलच्या दरात वाढ सुरू झाली आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!