‘एसएमएस’द्वारे कळणार पेट्रोल, डिझेलच्या किंमती

0
मुंबई | येत्या 16 तारखेपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच्या रोज बदलणार आहेत. या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर जाणून घेण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे.

त्यानुसार ग्राहकांना आता घरबसल्या मोबाईलवरून केवळ एक SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या दराची माहिती मिळणार आहे.

यासंबंधी वितरकांना एक दिवस आधी रात्री आठ वाजेपर्यंत पेट्रोल-डिझेलचे दुसऱ्या दिवशीचे दर कळवण्यात येतील असे वृत्त आहे. तर सामान्य ग्राहकांना मोबाईलवरून SMS पाठवून प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती मिळवता येईल.

यासंबंधी हिंदूस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या तिन्ही कंपन्यांनी आदेश जारी केले आहेत.

LEAVE A REPLY

*