इंधनदरात सलग चौथ्या दिवशी वाढ; नाशिकधील असे आहेत पेट्रोलचे दर

इंधनदरात सलग चौथ्या दिवशी वाढ; नाशिकधील असे आहेत पेट्रोलचे दर

नाशिक । प्रतिनिधी 

अमेरिकेच्या लष्करी कारवाईत इराणचा लष्करप्रमुख मारला गेल्याने मध्य पूर्वेवरील युद्धाचे ढग अधिकच गडद बनले आहेत. आखाती देशांतील अस्थिरतेच्या वातावरणात इंधन दरवाढ अटळ असून आज सलग चौथ्या दिवशीदेखील ही दरवाढ झाल्याचे दिसून आले.

देशात डिझेलच्या किमतीत आज दि. ६ ११ पैशांनी  तर पेट्रोलच्या किंमतीत ९ पैशांनी वाढ झाली. त्यामुळे नाशिकमध्ये आज डिझेल ६८ रुपये ०७ पैसे तर पेट्रोल ८० रुपये ६० पैसे प्रतिलिटरवर पोहोचली.

युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सतत वाढ होत असून जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीत तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी असलेल्या सोलीमनी यांच्या हत्येमुळे भौगोलिक राजकीय संघर्षाची भीती जगभरात वर्तवली जात आहे.

इराण आणि अमेरिकेतील संघर्ष आणखी वाढून त्याचा परिणाम थेट युद्धात होईल असे सांगितले जात आहे. भारतातील आवश्यक इंधनापैकी ८४ टक्के इंधन आयात केले जाते. एवढेच नाही  तर देशात  उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलाचे दरही आंतरराष्ट्रीय दराप्रमाणेच असतात.

आपल्याकडे मध्य पुर्वेतून होणाऱ्या तेल पुरवठ्यापैकी दोन तृतियांश पुरवठा सौदी अरेबिया आणि इराकमधून होतो. भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यात तातडीने कोणतीही कपात होण्याची शक्‍यता नसली तरी दरवाढीवर मात्र परिणाम होणार आहे.

पणिाम होणार आहे. सहा वर्षांत सर्वात कमी ४.५ टक्के विकासदर असताना देशाला वाढणाऱ्या इंधन किंमती वाढीचा मोठा फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे केवळ चलनवाढच होईल असे नाही तर सरकारला या इंधनावरील अनुदानही वाढवावे लागणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com