Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : इंधन दराचा भडका; शहरात पेट्रोल, डीझेल तीन रुपयांनी महागले

Share

नाशिक | प्रतिनिधी 

मोदी सरकारने दुसऱ्या पर्वातील पहिला अर्थसंकल्प काल (दि. ०५) संसदेत मांडला. अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इंधनावर कस्टम ड्युटी १ रुपयांनी वाढविल्याची घोषणा केली. त्यांनी घोषणा करताच पेट्रोल आणि डीझेलवरील वाढलेल्या अबकारी करामुळे दरात तब्बल तीन रुपयांची वाढ झाली आहे.

दुसऱ्याच दिवशी सर्वत्र पेट्रोल आणि डीझेलच्या दरात वाढ झाली आहे. आज नाशिकमध्ये पेट्रोल ७६.७० रुपये प्रतीलिटरवरून थेट तीन रुपये वाढून ७९.१० रुपयांवर गेले आहे. तर डीझेल ६६.८४ वरून ६९.२७ रुपयांवर गेले आहे.

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मार बसल्याने सर्वत्र नाराजीचा सुर आहे. पेट्रोल वाढल्यामुळे वाहतूक खर्च वाढणार आहे, परिणामी भाडेवाड होणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेलवरील अबकारी शुल्क, रस्ते अधिभारात लिटरमागे प्रत्येकी एक रुपयाची वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना फटका

अर्थसंकल्पातील पेट्रोल आणि डीझेलवरील अबकारी करत वाढ झाल्यामुळे या घटनेचा अधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी भाडेवाढ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आधीच मालाला पुरेशी मोबदला मिळत नाही. त्यात इंधन दरवाढ झाल्यामुळे बळीराजाला अधिक फटका बसणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!