Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत इतकी घट

Share

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आजही घट झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या सुमारे आठवडाभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण होत असल्याने लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यानुसार, आज पेट्रोल १५ तर डिझेल १० पैसे प्रतिलिटर स्वस्त झाले आहे.

तेल उत्पादक प्रमुख देश असलेला सौदी अरब देश तेलाच्या निर्यातीत कपात करणार आहे. डिसेंबरमध्ये तेलाची निर्यातीत प्रतिदिन पाच लाख बॅरलने घट होऊ शकते असे सौदी अरबच्या उर्जा मंत्र्यांनी म्हटले.

गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सौदीने तेल कपातीचा निर्णय घेतल्याचेही त्यांच्या उर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!