पेठरोड गोळीबार प्रकरण : औरंगाबादहून तिघा संशयितांना शिताफीने घेतले ताब्यात

0
नाशिक |  पंचवटीतील पेठरोड परिसरात काल (दि.२९) दुपारच्या सुमारास झालेल्या गोळीबारातील तिघा संशयितांना नाशिक पोलिसांनी औरंगाबादहून शिताफीने अटक केली.

संशयितांचे ठिकाण लागल्यामुळे काल रात्रीच नाशिक पोलिसांचे एक पथक  औरंगाबादला रवाना झाली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेतले. आज एक पथक औरंगाबाद येथे गेले असून रात्रीपर्यंत त्यांना नाशिकमध्ये आणले जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त होत आहे.

हप्ता न दिल्याच्या रागातून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यवसाय करणार्‍या एकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला होता.

या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. असून या प्रकरणात नाशिकरोड येथे महिन्याभरापूर्वी झालेल्या खून प्रकरणातील संशयित शेखर निकम, केतन निकम, विशाल भालेराव यांना औरंगाबाद येथून अटक केली तर संशयित संदीप पगारे यास नाशिक येथूनच काल रात्री ताब्यात घेतले होते.

पेठरोडवरील संदीप लाड गोळीबार प्रकरणात संशयित शेखर निकम व केतन निकम या दोघा भावांचे नाव समोर येत असून गत महिन्यात पेठरोड परिसरात शेखर निकम याचा भाऊ व सराईत गुन्हेगार किरण निकम याची हत्या झाली होती.

या घटनेनंतर भावाच्या खुनाचा सूड घेण्याच्या उद्देशातून शेखर निकम व त्याच्या साथीदारांनी त्याच्या भावाचे मारेकरी जेलरोड परिसरात आले असल्याचे समजून कसारा येथून नातेवाईकाकडे आलेल्या एका युवकाची हत्या केली होती.

या घटनेपासून संशयित शेखर निकम फरार होता. अखेर त्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे.

LEAVE A REPLY

*