Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पेठ तालुक्यातील ‘त्या’ भेगा भूकंपामुळे नव्हे तर अतिवृष्टीमुळे; अहवालातून स्पष्ट

Share

पेठ : मागील पंधरा दिवसांत पेठ तालुक्यातील घोटविहीरा, लिंगवणे आदी ठिकाणी डोंगरावरील जमीनीस भेगा पडून जमीन खचण्याचा प्रकार आढळून आला होता. दरम्यान हा प्रकार अतिवृष्टीमुळे झाला असून कठीण खडकाच्या जोडातून पाणी जमीनीत झिरपून पोकळी निर्माण झाल्याने भेगा पडल्या असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

वरिष्ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण विभाग महाराष्ट्र शासन नाशिक कार्यालयाने तहसिलदार यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केल्याने पेठ तालुक्यात भुकंपाचे हादरेने जमीनीस भेगा पडण्याचे शंकेस पुर्णविराम मिळला आहे.

घोटविहीरा येथे डोंगरास उभ्या भेगा पडणे, जमीन खचणे असा प्रकार उघडकीस येताच प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. त्यावेळी विस्थापितांसाठी नाशिक येथील सेवाभावी संस्थेने सामाजिक जबाबदारीच्या भावनेने त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी भुवैज्ञानिक यांच्या समवेत घटनास्थळी भेटी दिल्या. त्या नुसार वरिष्ठ भुवैद्यानिक यांनी परिक्षण करूण सदरचा प्रकार अतिवृष्टीने जमीनीत खडकांच्या भेगांमधून पाणी झिरपल्याने जमीन खचणे, भेगा पडणे असे प्रकार घडल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने नागरिकांमध्ये तयार झालेले भीतीचे वातावरण कमी होण्यास मदत होणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!