पेठ नगरपंचायतीत तत्काळ मुख्याधिकारी नेमण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

0

दिंडोरी, ता. २३ : पेठ नगरपंचायतीत तत्काळ मुख्याधिकारी नेमण्याचे आदेश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नगरपंचायत निवडणुका होऊन नगराध्यक्ष निवडून आले, त्यासस आता 8 महिन्याचा कालावधी उलटूनही पेठ, जि.नासिक नगरपंचायतीस मुख्याधिकारी नियुक्ती होत नव्हती.

दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी पेठ नगरपंचायतीचे पदाधिकाऱ्यांसह मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

खा.चव्हाण यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री ना फडणवीस यांनी तात्काळ पेठ नगरपंचायतीस मुख्याधिकारी नेमण्याचे आदेश दिले.

या शिष्ट मंडळात उपनगराध्यक्ष मनोज भोंगे, भास्कर गावित, बापू पाटील, कांतीलाल राऊत आदींसह नगरसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*