पेठ तालुक्यातील भूगर्भीय आवाजाचे गूढ अद्यापही कायम; प्रशासनाची बेफिकीरी 

0

पेठ (प्रतिनिधी) ता. १७ : काल दि .१६ रोजी तालुक्यात दुपारी झालेल्या स्फोटसदृश्य आवाजाचे गुढ अजूनही उकलेलेले नाही.

प्रसिद्धी माध्यमांनी यासंदर्भात प्रशासनाला माहिती दिल्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने भुकंपप्रवण क्षेत्र असलेल्या गोंदे , भायगाव , डोल्हार माळ ,कोहोर या पट्यात जमीनीतून आवाज आल्याची प्राथमिक माहिती मिळविली. तसेच हा सौम्य भूकंप असल्याचे अनौपचारिकरित्या सांगितले.

मात्र सदर जागेवर जमीन खचणे, जमीनीस भेग पडणे, आदी प्रकार झाले किंवा नाही यासाठी घटनास्थळी कुणीही जबाबदार अधिकारी गेलेले नाही.

त्यातच आज सुटीचा दिवस असल्याने या गंभीर व धोकादायक प्रकाराकडे पाहण्यास कुणासही स्वारस्य नसल्याचे चित्र होते.

तलाठी किंवा पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला नाही.

यासंदर्भात भविष्यात नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास त्यासाठी प्रशासनाकडे कुठलीही ठोस उपाय योजना नाही.  त्यातून आपत्तीबाबत प्रशासनाची उदासी आणि बेफिकीरीच दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

*