महाराष्ट्र बँकेच्या पेठ शाखेतील आर्थिक गैरप्रकार उघडकीस 

0

पेठ दि .१० (प्रतिनिधी) : लोकांचा विश्वास असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या पेठ शाखेत ग्राहकाचे पैसे परस्पर काढून घेण्याचा गैरप्रकार चव्हाट्यावर आला आहे.

महाराष्ट्र बॅकेच्या पेठ शाखेत कॅशिअरकडूनच नागरीकांच्या खात्यातील पैसे परस्पर काढण्याचे तसेच तक्रार होण्याचे चिन्ह दिसताच ग्राहकास पटवून हडप केलेली रक्कम भरण्यात आल्याचा प्रकार यापूर्वीही घडलेले होत.

मात्र त्याचा उद्रेक मात्र आज ( दिं .१० ) झाला.

येथील खातेदार सुनिता माधव पवार यांच्या खाते क्र .२५०४०३६९५७६ बाबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या खात्यावर १५ मे रोजी ४६००० रूपये भरणा करण्यात आला व तशी पावतीवर बॅकेचा शिक्का मारण्यात आला. मात्र १४ जून रोजी बँकेत गेले असता सदर खात्यावर ११६४ रुपये असल्याचे सांगण्यात आल्याने पवार यांना धक्का बसला.

आपण १५ मे रोजी भरलेल्या पैश्याबाबत विचारणा केली असता .कॅशिअरने माफी मागून सदरचे खात्यात दि १४ जून रोजी २१००० व  २५००० अशा रकमांची नोंदी पासबुकावर करुन देण्यात आल्या.

पडत्या फळाची आज्ञा मानून पवार कुटुंबीयांकडून सदरची बाबीवर पडदा टाकला.

काही काळानंतर या खात्यावरून पुन्हा त्याच दिवशी प्रत्येकी २०००० प्रमाणे दोनदा उचल केल्याची नोंद पासबुकात  केल्याचा प्रकार आज दि. १० रोजी उघडकीस आल्याने ही बाब पवार कुटुंबीयांनी शाखाधिकारी बागूल यांच्या निर्दशनास आणून दिली.

त्यांनी त्या दिवशीचा व्यवहार व स्लिपा यांचा शोध घेतला असता  हा सर्व बेनामी असल्याचे मान्य केले असून या प्रकरणी संबधीत कॅशिअरचे विरुद्ध वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्याचे लेखी आश्वासन दिले.

असाच आर्थिक घोटाळा लहानीबाई शिवराम वळवी खाते क्र .२५०३९१०११३६  यांच्या व ज्ञानेश्वर हरी भोये खाते क्र .६०१५९७६८४२९ यांच्याही खात्यावर घडलेली असल्याने या तिनही तक्रारी आपण वरिष्ठांकडे देत असून सर्वांचे पैसे भरपाई देण्याचे आश्वासन शाखाधिकारी बागुल यांनी लेखी पत्राद्वारे दिले आहे .

शाखाधिकाऱ्यांनी दिलेले पत्र

LEAVE A REPLY

*