Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : पाळीव श्वानाचा अपघातात मृत्यू; चालकाविरोधात गुन्हा दाखल

Share
कुत्र्याच्या तोंडात अर्भक दिसल्याने निमगावजाळी परिसरात खळबळ, Latest News Dog Infant Problems Nimgav Jali

इंदिरानगर | वार्ताहर

कलानगर येथे टेम्पोने धडक दिल्याने पाळीव श्वान ठार झाल्याने टेम्पो चालकावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सोमवार दि(११) रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास अर्चना काळे (३४ रा नंदनवन रो हाऊस कलानगर ) ह्या त्यांनी पाळलेले श्वानास कलानगरच्या रस्त्याने घेऊन जात असताना कलानगर पासून ते भैय्या वाडी च्या रस्त्यावरुन पिकप टेम्पो क्रमांक एम एच १५सी के ४४३३ ) भरधाव वेगाने आला व श्वानास धडक देऊन त्याच्या अंगावरून टेम्पो गेला.

या घटनेत श्वान गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित चालक आरोपी गौतम गोटे यांच्या विरोधात भादवी कलम २७९, ४२८, ४२९ नुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!