Type to search

नगरमध्ये मुदत संपलेला लाखोंचा किटकनाशक साठा

Featured सार्वमत

नगरमध्ये मुदत संपलेला लाखोंचा किटकनाशक साठा

Share

पृथ्वी अ‍ॅग्रोवर कृषी विभागाची धाड जिल्हाभरात चौकशी होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुदतबाह्य कीटकनाशकांवर नव्याने लेबल लावून ते मार्केटमध्ये विकण्याचा प्रकार नगरमध्ये समोर आला आहे. कृषी विभागाच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण पथकाने नगरच्या मार्केटमधील पृथ्वी अ‍ॅग्रो सर्व्हिसेसच्या गोदामावर गुरुवारी (ता.16) दुपारी दोन वाजता छापा घालून मोठ्या प्रमाणात कीटकनाशके जप्त केली. यावेळी पृथ्वी अ‍ॅग्रो सर्व्हिसेसचे गोदाम सील करण्यात आले असून मुदत संपलेली किटकनाशके आता कृषी विभागाच्या प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकार्‍यांकडून देण्यात आली.

दरम्यान, जिल्हाभरातील काही विक्रेत्यांनी या दुकानातून किटकनाशके घेतलेली आहेत. त्यामुळे कुठे कुठे ही किटकनाशके देण्यात आली याचीही चौकशी होणार असल्याने काहींचे धाबे दणाणले आहेत. शहरातील मार्केट यार्डमधील एका 60 बाय 40 फूट मोठ्या गोदामात मुदतबाह्य झालेल्या कीटकनाशकांवरील लेबल बदलून त्यावर नव्याने लेबल लावण्याचा प्रताप सुरू असल्याची गोपनिय माहिती कृषी विभागाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी अचानक कृषी विभागाच्या मुख्य गुणवत्ता नियंत्रण पथकाने दुपारी दोन वाजता पृथ्वी अ‍ॅग्रो सर्व्हिसेसच्या गोदाम आणि दुकानावर धाड टाकली. या गोदामांमध्ये मुदतबाह्य कीटकनाशके आढळली.

पथकावर राजकीय दबाव
ज्या अ‍ॅग्रो सर्व्हिसेसच्या गोदामात हा साठा सापडला आहे, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. कृषी विभागाने छापा टाकल्यानंतर त्याठिकाणी कारवाई करणार्‍या अधिकार्‍यांवर राजकीय गोटातून चांगलाच दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याठिकाणी माध्यम प्रतिनिधी पोहचल्यामुळे संबंधित राजकीय व्यक्तिंना गप्प बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अलिकडच्या काळात कृषी विभाागाने केलेली ही मोठी कारवाई आहे.

स्वतंत्र पथक करणार तपासणीे
या गोदामात असणारी किटकनाशके यांची तपासणी करण्याठी कृषी विभागाला 8 ते 10 लोकांचे स्वतंत्र पथक लागणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात किटकनाशकांचा साठा असून हा साठा कधी आला होता. त्यापैकी कितीची विक्री आणि किती साठा शिल्लक होता, यातून किती साठ्यावर नव्याने लेबल लावून त्याची विक्री करण्यात आली याची माहिती घेण्याचे आवाहन कृषी विभागासमोर आहे. यासाठी काही मुदत लागणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!