Friday, April 26, 2024
Homeनाशिकव्यक्ती-अभिव्यक्तीची भाषा मराठीच असावी – प्रा. विद्या सुर्वे

व्यक्ती-अभिव्यक्तीची भाषा मराठीच असावी – प्रा. विद्या सुर्वे

देवळा | वार्ताहर

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात घरातील प्रत्येकाचे संवाद ई-संवाद झाले आहेत. संवादाचे साधन कुठलेही असो मात्र, व्यक्ती आणि अभिव्यक्तीची भाषा मराठी असली पाहिजे असे प्रतिपादन लेखिका आणि पंचवटी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका विद्या सुर्वे बोरसे यांनी केले.

- Advertisement -

देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे कुसुमाग्रज जयंती व मराठी राजभाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, समाजातील प्रत्येक घटकाने, व्यक्तीने आपआपल्या शैलीने आणि आपल्या मराठी भाषेतूनच व्यक्त व्हावे.  जानेवारीच्या पहिल्या साप्ताहिक पासून ते सबंध वर्षे संपे पर्यंत शासनाकडून मराठी भाषा वाचवण्याचा, रुजवण्याचा आणि जिवंत ठेवण्याच्या हालचाली सुरु होतांना दिसतात.

अशी वेळ जेव्हा एखाद्या संकल्पनेला येते, तेव्हा ती धोक्याची सुचना असते. समाजातील प्रत्येक घटकांची भाषा रुजवण्याची नैतिक जबाबदारी आहे. दुसऱ्या कोणाला सांगण्याच्या तत्पूर्वी त्यांनी स्वतः मराठीचा आत्मिक गौरव वाढवावा. बदलत्या काळाप्रमाणे प्रत्यक्ष संवादाची वेळ आता कमी-कमी होताना दिसत आहे. बहुतेक भविष्यातील पिढी ही अबोली जन्माला येणार नाही ना? अशीही खंत याप्रसंगी प्रा. सुर्वे यांनी व्यक्त केली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य बापुसाहेब आहेर हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात मातृभाषेचा गौरव हा ‘स्व’नेच प्रत्येकाने करावा सांगितले.

कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.ए.बी. पवार, उपप्रचार्या डॉ. एम. एच. आहेर, प्रा. व्ही. डी. काकवीपुरे, प्रा. एम. आर. बच्छाव, प्रा. डी. के. आहेर, प्रा. डॉ. जयमाला चंद्रात्रे, प्रा. बी. के. देवरे, प्रा. एस. व्ही. पवार, प्रा. डॉ. सुनिल भामरे,प्रा.ए.ए.बोरसे, ग्रंथपाल भुषण आहिरे, प्रा. गितल बच्छाव यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा.रवींद्र पगार यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अंजली आहेर हिने केले, आभार तेजल कोठावदे हिने व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या