त्र्यंबकेश्वर मंदिरात फुले वाहण्यास परवानगी

भाविकांच्या भावना म्हणजे फुले न्यायाधीशांचे मत

0

त्र्यंबकेश्वर । ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाना फुले वाहण्यास मंदिर ट्रस्टकडून परवानगी देण्यात आली आहे.भाविकांच्या देवाविषयी भावना म्हणजे फुले आहेत अशा शब्दात चेअरमन न्यायाधीश पी के चिटणीस यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

या मंदिरात गेले 3 वर्ष फुले वाहण्यास बंदी होती.ही बंदी उठवण्यात आल्याने भाविक व फुल विक्रेत्यांंनी आनंद व्यक्त केला.सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दीत व पोलिसांच्या सुचनेचे पालन करणे हे कारण पुढे करून मंदिरात फुल नेण्यास बंदी करण्यात आली होती.अलीकडे मंदिर प्रांगणातील दीपमाळे जवळ भाविकांनी आणलेली फुले दीपमाळ याठिकाणी जमा करुन घेतली जात होती.

त्यामुळे फुले देवाला वाहू द्यावी ही मागणी भाविकांकडून होत होती.भाविक, विक्रेते तसेच विश्वस्त ललिता शिंदे यांनी या बाबत आवाज उठवला होता.दि.24 रोजी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट मंडळ विश्वस्त यांची विविध विषयाना वरील बैठक मंदिर ट्रस्टचे चेअरमन न्यायाधीश चिटणीस यांंच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात मंदिरातील फुलबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला.

जगभरातून येणारे भाविकांना त्यांच्या भावना देवापर्यंत पोहचवायच्या असतात.देवावरील श्रद्धेचे प्रतीक फुलांच्या रूपाने या भावना देवाजवळ पोहचाव्यात, त्यांना समाधान मिळावे.या उद्देशाने फुले मंदिरात नेण्यास ट्रस्ट मंडळाने परवानगी दिली.
-चेअरमन तथा न्यायाधीश पी.के.चिटणीस

LEAVE A REPLY

*