अमेरिकेत मॉलमध्ये हल्ला; ३ ठार

0

फ्लोरिडा : फ्लोरिडाच्या जॅक्सनविल येथे एका हॉटेलमध्ये काही लोकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तीन जण ठार झाले असून ११ जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्यांपैकी एकाला ठार करण्यात पोलिसांना यश आलं असून या घटनेमुळे जॅक्सनविले परिसरात तणावाचे वातावरण आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत गोळीबार  आवाज ऐकू येत आहे. दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

जैक्सनविले शेरिफ कार्यालय ने ट्वीटकरून दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अज्ञातांनी जॅक्सनविल लँडिंग परिसरातील एका रेस्तराँमध्ये संशयित हल्लेखोरांनी जमावावर अचानक गोळीबार केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी जॅक्सनविलकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले असून गोळीबार करणाऱ्या संशयित हल्लेखोराला ठार करण्यात पोलिसांना यश आहे. तर दुसऱ्या हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

*