वाढीव पेन्शनसाठी निवृत्तांचे जिल्हा बँकेला साकडे

0
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवानिवृत्तांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे हायर सॅलरी हायर पेन्शनचा लाभ मिळण्याची मागणीचे निवेदन ईपीएस-95 पेन्शनर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने प्रॉव्हिडंट फंड विभाग प्रमुख संतोष गोरे यांना देताना अध्यक्ष सुभाष पोखरकर, उपाध्यक्ष संपतराव समिंदर, सरचिटणीस नारायण होन, पी.यू. धीवर, सावळेराम झिने, संपतराव गुंड आदी.

नगर टाइम्स,

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे हायर सॅलरी हायर पेन्शनचा लाभ मिळण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सेवानिवृत्तांना अतिशय अल्प पेन्शन मिळत आहे. यामुळे अत्यंत हलाखीचे जीवन जगण्याची वेळ पेन्शनरांवर ओढवली आहे. त्यांच्या एकूण पगारावर प्रॉव्हिडंट फंड कपात होऊन सुद्धा प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाच्या चुकीच्या निर्णयामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या सर्व सेवानिवृत्तांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे हायर सॅलरी हायर पेन्शनचा लाभ मिळण्याची मागणी ईपीएस-95 पेन्शनर वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.

असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे व प्रॉव्हिडंट फंड विभाग प्रमुख संतोष गोरे यांना निवेदन देऊन या मागणी संदर्भात चर्चा केली. यावेळी अध्यक्ष सुभाष पोखरकर, उपाध्यक्ष संपतराव समिंदर, सरचिटणीस नारायण होन, पी.यू. धीवर, सावळेराम झिने, संपतराव गुंड आदि उपस्थित होते. सुभाष पोखरकर म्हणाले की, कोल्हापूर, सोलापूर, विदर्भ व मराठवाड्यातील अनेक जिल्हा बँकांनी वाढीव पेन्शनचे प्रस्ताव संबंधित प्रॉव्हिडंट कमिशनर यांना पाठविले असून प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाने संबंधित पेन्शनरांना याबाबत पत्र पाठविलेले आहेत. त्याचे दोन नमुना केसेसचे प्रती बँकेला देत नाशिक कार्यालयाशी पाठपुरावा करावा अशी विनंती शिष्टमंडळाने केली. बँक याबाबत निश्चित पाठपुरावा करून सेवानिवृत्तांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे व प्रॉव्हिडंट फंड विभागाचे प्रमुख संतोष गोरे यांनी दिले.

 

LEAVE A REPLY

*