Video : पेन्शनर्सचा पीएफ कार्यालयावर मोर्चा; मागण्या मान्य करा अन्यथा दिल्लीत जाऊ

0
नाशिक | नव्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार  पेन्शनर्सच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा.

वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी इएसआयसी च्या माध्यमातून मोफत सेवा मिळावी. बँकखाते झिरो बलेंस करण्यात यावे. अशा सात मागण्या मान्य करण्यासाठी पेन्शनर्सने पीएफ कार्यालयावर आज दुपारी मोर्चा काढला.

भर पावसात या मोर्चेकऱ्यांनी पीएफ कार्यालयाच्या बाहेर ठाण मांडले होते. पेन्शनची रक्कम वाढवण्यात यावी तसेच त्यावर डीए देण्यात यावा. मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीत आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

यावेळी ईपीएफ पेन्शनर्सच्या वतीने कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले. तसेच EPFO चा यावेळी या पेन्शनर्सने निषेध केला.

 

LEAVE A REPLY

*