शिर्डीत रविवारी पेन्शनर्स संघटनेचे देशव्यापी अधिवेशन

0
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना श्रीरामपूरचे पाहिले देशव्यापी अधिवेशन स्व. बबनराव पवार सभागृह, साई पालखी निवारा,शिर्डी कोपरगाव रोड शिर्डी येथे पेन्शनवाढ, कोशियारी कमिटी शिफारशी लागू करा, आरोग्य सुविधा मिळाव्यात, अन्नसुरक्षा कायदा लागू करावा, इ. प्रश्‍नी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन केंद्रीय कामगार मंत्री ना.बंडारू दत्तात्रय यांच्याहस्ते होणार असून राज्याचे कामगार मंत्री ना.संभाजीराव निलंगेकर अध्यक्षस्थानी, तर पालकमंत्री राम.शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खा.दिलीप गांधी, खा.विजयसिंह मोहिते पाटील, खा.चंद्रकांत खैरे, खा.आनंदराव अडसूळ, आ.बाळासाहेब थोरात, खा.एम. के. प्रेमचंद्रन, कोलम, आ.बाळासाहेब मुरकुटे, आ.स्नेहलताताई कोल्हे, नगराध्यक्षा सौ.योगीताताई शेळके, आ.शिवाजीराव कर्डिले, अध्यक्ष साईबाबा संस्थान सुरेश हावरे,
उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. साई संस्थान विश्‍वस्त भाऊसाहेब वाकचौरे हे स्वागताध्यक्ष राहणार आहेत. तसेच देशातील पेन्शनर्स संघटना प्रमुख पदाधिकारी हनुमंतराव ताटे, प्रकाश येंडे, समन्वयक अतुल दिघे, अशोकराव राऊत, भीमराज डोंगरे, देवराम पाटील, प्रवीण कोहली, चंद्रशेखर परसाई, एम. आर. जाधव, वीरेंद्र सिंग इ. उपस्थित राहणार आहेत. दि. 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा.देशातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक, दि. 13 ऑगस्ट सकाळी 10 वा.उद्घाटन तसेच ना.बंडारू दत्तात्रय व मंत्री, खासदार आमदार यांचे मार्गदर्शन 1 ते 2 वा.भोजन, 3 ते 4 पेन्शनर्स संघटना प्रमुख पदाधिकारी मार्गदर्शन, 5 वा.समारोप होईल.
या पहिल्या देशव्यापी अधिवेशनास राज्यातील,जिल्ह्यातील सर्व इपीएस पेन्शनधारकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष गोरख कापसे,सरचिटणीस सुभाष कुलकर्णी,

कार्याध्यक्ष एस.एल. दहिफळे, सुभाष पोखरकर, उपाध्यक्ष ज्ञानदेव आहेर, बाबासाहेब गाडे, बाबुराव दळवी, जयराम उफाडे, राजेंद्र होनमाने, अशोक पवार, गफूर दुर्गुडे, भागीनाथ काळे, बाळासाहेब चव्हाण, नारायण होन, अशोक पाटील, म. रा. सर्व श्रमिक महासंघ चिटणीस आनंदराव वायकर, बी.एल. कदम, रमेश गवळी, शरद नेहे, विष्णुपंत टकले, शिवाजी औटी, अविनाश घुले, गोकुळ बिडवे, बाबा आरगडे तसेच जी. बी. घोरपडे, सुभाष गरकल, सुरेश सातव, अशोक भवार, बी. डी. साबळे, सुधाकर चव्हाण,.केशव जाधव, लक्ष्मण गरुड, सुभाष छल्लारे, प्रकाश कुटे, दगडू घुणे, नामदेव बडाख, यशवंत वर्पे, बबन वाकचौरे, डी.सी.आंग्रे, अच्युतराव सांगळे, अंकुश गव्हाणे, आबा सोनवणे, एस. के. सय्यद, एस. के. समिंदर, टी सय्यद, थोरात, पोंदे, सोनवणे, कराळे, विंचू, मुठे, लोळगे आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

*