हयातीची डिजीटल नोंदणी न केल्यास पेन्शन बंदचा इशारा

0
सातपूर | दि. ६ प्रतिनिधी- भविष्य निर्वाह निधी विभागातर्फे सातत्याने पाठपूरावा करुनही काही पेन्शन धारकांनी हयातीचे दाखले संगणकीय पध्दतीने न भरल्याने त्यांचे निवृत्ती वेतन मे महिन्यापासून बंद करण्यात येणार असल्याचा इशारा विभागातर्फे देण्यात आला आहे.

वेळोवेळी आवाहन करुनही ज्येष्ठ लोक याबाबत उदासिनता दाखवत असल्याने ठोस पावले उचलण्याचा निर्णय गेण्यात आला आहे. या पेन्शनदारकांना अखेरची संधी म्हणून हयातीचे दाखले संकणीकृत नोंदणी करुन घेण्याचे शेवटचे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी निवृत्ती वेतन धारकांनी पीपीओ नंबर, पासबूक, आधार कार्ड, मोबाईल सोबत आणून सेतू कार्यालय, ई-सेवा केंद्र किंवा नाशिक, जळगाव अथवा नगर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जाऊन डिजीटल जीवन प्रमाणपत्रांची नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन भविष्य निर्वाह निधी विभागाचे सहआयुक्त राहुल पवार यांनी केले आहे.

या नंतर नोंदणी न केल्यास पेन्शन बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बहुतांश निवृत्ती वेतन धारकांनी प्रक्रिया पूर्ण केलेल्या काहेत. काही लोक शिल्लक आहेत. त्यांनी देखिल तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

*