Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यापेन ड्राईव्ह प्रकरणाची 'सीआयडी' चौकशी; 'सीबीआय' चौकशीची भाजपची मागणी

पेन ड्राईव्ह प्रकरणाची ‘सीआयडी’ चौकशी; ‘सीबीआय’ चौकशीची भाजपची मागणी

मुंबई | Mumbai

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा एक पेन ड्राईव्ह ब़ॉम्ब (Pen drive Bomb) फोडला. यात एक ऑडिओ (Audio) असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली होती. फडणवीसांनी आज पुन्हा एक पुरावा सादर केला. त्यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर गंभीर आरोप केले आहेत….

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी सभागृहात उत्तर दिले आहे. पेन ड्राईव्ह प्रकरणाचा तपास करणार, सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavhan) यांनी आपल्या वकीलपत्राचा राजीनामा दिला आहे.

तो राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. याप्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही. पेन ड्राईव्हचा तपास सीआयडीकडे (CID) सोपवण्यात आल्याची घोषणा वळसे-पाटील यांनी सभागृहात केली. तसेच या तपासातून खरी वस्तूस्थिती समोर येईल, असे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

फडणवीस यांनी १९९३ आणि २००८ च्या बॉम्बस्फोटाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. मला पोलिसांचा (Police) अभिमान आहे. पण ज्या पोलीस दलाचा अभिमान आहे, त्याच पोलीस दलावर विश्वास न ठेवता, प्रत्येक प्रकरण सीबीआय (CBI) किंवा दुसऱ्या केंद्रीय तपास यंत्रणेकडे पाठवणे बरोबर नाही असा टोलादेखील वळसे-पाटील यांनी फडणवीसांना लगावला.

त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे प्रकरण सीआयडी ऐवजी सीबीआयकडे द्यावे. हे प्रकरण सीबीआयकडे दिले नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला. तसेच प्रकरण सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी धरत भाजपने (BJP) सभात्याग केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या