पीसी-निकच्या नात्याचा नवा अवतार

0
मुंबई– सध्या प्रियांका व निक ज्याप्रमाणे एकत्र वेळ घालवत आहेत, त्यावरून तरी हाच अंदाज निघतो की, प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास रिलेशनशिपमध्ये आहेत. प्रियांका व निकचे ताजे फोटो पाहिल्यानंतर तर या दोघांत नक्की काहीतरी खिचडी शिजतेय, याची खात्री पटते. प्रियांका व निक या दोघांचे ताजे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. हे फोटो आहेत, निकच्या कझिनच्या लग्नाचे. या लग्नाला प्रियांकाही हजर होती. दोन दिवसांपूर्वी निकच्या हातात हात घालून प्रियांका न्यूयॉर्कच्या विमानावर दिसली होती. हे दोघे न्यूजर्सीला गेले होते. निमित्त होते निकच्या कझिनचे लग्न. या लग्नात प्रियांका व निक दोघांनीही एकमेकांना एक क्षणही दूर केले नाही.

गोल्डन ड्रेसमधील प्रियांकाने निकसोबत या लग्नात प्रचंड मज्जामस्ती केली.तूर्तास निकने आपल्या फॅमिली वेडिंगमध्ये प्रियांकाला सोबत घेऊन जाणे, यावरून अनेक अंदाज बांधले जात आहेत. निक व प्रियांका यांनी अद्याप आपल्या रिलेशनशिपबाबत अधिकृत घोषणा केली नाही. पण दोघेही कधी नव्हे इतके बिनधास्त हातात हात घेऊन फिरताना बघितल्यावर कुणापासूनही काहीही लपून राहणे शक्य नाही.

LEAVE A REPLY

*