Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘लक्ष द्या’ व ‘काळजीपूर्वक ऐका’; खा. गोडसेंच्या प्रश्नावरून दानवेंना लोकसभा अध्यक्षांनी फटकारले

Share

नवी दिल्ली | प्रतिनिधी

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना सभागृहाच्या कामकाजाकडे लक्ष न दिल्याबद्दल चांगलेच फटकारले. केंद्रीय ग्राहक व्यवहार राज्यमंत्री यांच्या वर्तनास सभापतींनी सपशेल नाराजी व्यक्त केली.  शिवसेनेचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांनी प्रश्न विचारला असता  खा. दानवे यांनी खासदारांना हा प्रश्न पुन्हा विचारण्यास सांगितले. यानंतर सभापतींचा पारा अधिकच चढला त्यांनी आदरणीय मंत्री  ‘प्रश्नांकडे लक्ष द्या, काळजीपूर्वक ऐका’ असे दानवे यांना सुनावले.

ते म्हणाले, “मी आणखी एक संधी देईन, पण तोच प्रश्न विचारू नका” असे सांगून खा. गोडसे यांना तोच प्रश्न विचारू नका असेही ओम  बिर्ला यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभेतील शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी गोडसे यांच्या जागेवर जाऊन सभापतींनी जे सांगितले त्याविषयी त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी खा. सावंत यांना सांगत बिर्ला म्हणाले की, खा. गोडसे यांना जे काही सांगायचे ते थोडक्यात सांगा.  खा. गोडसे यांनी आणखी एक प्रश्न विचारला असता, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान जे शेवटच्या ओळीत श्री दानवे यांच्यासमवेत बसले होते, त्यांनी उभे राहून उत्तर दिले.

त्यानंतरच्या पूरक प्रश्नांनाही श्री पासवान यांनी उत्तर दिले. हे पाहून सभापतींनी त्यांची इच्छा असल्यास बसून उत्तरे देण्यास सांगितले. बिर्ला म्हणाले, “तुमची इच्छा असेल तर तुम्ही बसून उत्तर द्या. सभा तुम्हाला परवानगी देते. तुमच्या पायाला फ्रॅक्चर आहे,” श्री बिर्ला म्हणाले. तथापि, खा. पासवान यांनी उभे राहूनच प्रश्नांची उत्तरे दिली.

यानंतर बिर्ला यांनी पुनरुच्चार करत “मी पुन्हा सांगत आहे, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बसून उत्तर देऊ शकतात असे म्हणत सभागृहाची काळजी असल्याचेही बिर्ला यांनी दाखवून दिले.

यापूर्वी, प्रश्नोत्तराच्या वेळी पूरक प्रश्‍न विचारण्यास नावे दिल्यानंतर सभागृहात अनेक सदस्यांच्या अनुपस्थितीबद्दल नाराज सभापतींनी सांगितले की, हिवाळी अधिवेशनात ज्यांना प्रश्न विचारायची असतात अशा व्यक्तींची नावे दिली जातात. त्यानंतर त्यांची अनुपस्थिती दिसून येते अशा सदस्यांना अशा वेळी प्रश्न विचारण्याची संधी दिली जाणार नाही अशी तंबीही त्यांनी याप्रसंगी दिली.

प्रारंभी, गोडसे यांनी प्रश्न विचारला की, एफसीआय अंतर्गत वन परिसरात किंवा डोंगराळ परिसरात  दळणवळण अनुदान जे आहे ते २०१५ -१६ मध्ये ६० कोटी होते. ते २०१८-२०१९ मध्ये ४०० कोटी वर गेले. दुसऱ्या एका अनुदानात जे २०१५ -१६ मध्ये १ लाख होते ते अवघ्या तीन वर्षांत वाढून १०० कोटीवर गेले. हे का वाढले याबाबत प्रश्न खासदार गोडसे यांनी विचारला होता.

यावर काही उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारला असताना वरील प्रकार अधिवेशनात घडला. यावेळी पायाचे हाड मुडले असतानाही केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी उभे राहून उत्तर दिले. दरम्यान, पाहिजे तसे किंवा राज्याच्या भल्यासाठीचे उत्तर पासवान यांच्याकडून मिळाले नसल्याचेही गोडसे यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!