2 टक्के रक्कम भरा घर नावावर करा; कारडा कन्स्ट्रक्शनची नवीन योजना

0

नाशिक : नाविन्यता, पारदर्शकता, विश्वासार्हता आदीमुळे बांधकाम क्षेत्रात आपला ठसा उमटवणार्‍या कारडा कन्स्ट्रक्शन नेहमी आपल्या ग्राहकांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना आणत असते.

नाशिककरांचे गृहस्वप्न साकार करण्यासाठी कन्स्ट्रक्शनतर्फे 2 टक्के रक्कम भरा आणि घर नावावर करा अशी नवीन योजना आणली आहे. या योजनेअंर्तगत सर्वसामान्याना घर घेणे अथवा गुंतवणूक करणे सहज शक्य होणार आहे. या नव्या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे कन्स्ट्रक्शनतर्फे सांगण्यात आले.

या योजनेअंतर्गत 2 टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित 98 टक्के रकमेसाठी बँक कर्जही उपलब्ध आहे. यात महिलांसाठी विशेष सवलत म्हणजे फक्त 8.35 टक्के व्याजदरात कर्ज उपलब्ध होते. सोबत प्रधानमंत्री आवास याजेनअंर्तगत 2.70 लाख रुपये सबसिडीचा लाभ होवू शकतो.

फक्त स्टॅम्प व रजिस्टे्रशन खर्च करून सर्व सुखसोयी मिळवण्याची सुवर्णसंधी साधता येणार आहे. ही योजना कॅप्सुल होमच्या अंतर्गत असून डॉक्टर, फोटोग्राफर, शिक्षक, टेलर, शेतकरी, गृहिणी, बीपीओ एक्झिक्युटीव, फॅशन डिझायनर, विनकामगार, रिक्षाचालक, पोलीस व इतरांना घर घेणे सोपे होणार आहे.

शहरात खर्जुल नाका, नाशिकरोड, मखमलाबाद, चेहेडी, इंदिरानगर, पाथर्डी फाटा, जेल रोड, जुना सायखेडा रोड येथे या योजनेअंर्तगत 16.5 लाखापासून घरे उपलब्ध आहे. सर्व फ्लॅटस् वास्तूशास्त्रानूसार बांधलेले असून अधिक माहितीसाठी 8554990304 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*