Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पाटोद्यात विहिरीत तरूणाचा मृददेह आढळला; गावात एकच खळबळ

Share

पाटोदा (प्रतिनिधी)– पाटोदा येथील संदीप बाळकृष्ण कुंभारकर या तरुणाचा मृतदेह स्मशानभूमी जवळील विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे हा घातपात की आत्महत्या याविषयी चर्चा होत आहे, तर अनेकांच्या मते हा घातपाताचा प्रकार असून याची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

संदीप हा 12 ऑगस्ट पासून पाटोदा येथून बेपत्ता झाला होता नातेवाईकांनी शोध घेऊनही संदीप मिळून आला नव्हता काल पाटोदा येथे एका मृतदेहाचा अंत्यविधी आटोपल्यावर या विहिरीतील पाणी काढण्यात आले होते मात्र तेव्हा विहीरीत असा कोणताही प्रकार आढळून आला नव्हता त्यामुळे हा घातपाताचाच प्रकार असावा अशी चर्चा पाटोद्यात सुरू आहे.

संदीपच्या मृतदेह विहिरीबाहेर काढून पोस्टमार्टेम साठी येवला येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. संदीप याला एकच बहीण असून ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी काळाने भाऊ हिरावून नेल्याने तिच्यासह कुंटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

संदीप याचे तीन ते चार महिन्यापूर्वी लग्न झाले असून अचानक ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे संदीप याच्या मागे आई वडील एक भाऊ व एक बहीण असा परीवार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!