Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

नेवासा : गवतातून विषबाधा; आतापर्यंत ४६ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू

Share

देवगडफाटा | (वार्ताहर )

नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे विषारी गवताच्या मुळ्या खाल्ल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूचा आकडा ४६ वर गेला आहे. नदीचे पाणी कमी झाल्यामुळे परिसरातील मेंढपाळांनी मेंढ्यांना नदीपात्रात उगवलेल्या गवतावर मेंढ्या चरण्यासाठी सोडले होते.

हे गवत खाल्ल्यानंतर एक-एक करत अनेक मेंढ्यांनी माना टाकल्या. अनेक मेंढ्यांच्या तोंडातून फेस येत होता. अनेक अत्यव्यस्थ झाल्या होत्या. यात काल २० मेंढ्या व ५ शेळ्या दगावल्या होत्या.

दरम्यान, आजही परिस्थिती अशीच असून अनेक मेंढ्या सकाळी दगावल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आज दुपारी नगरहून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तसेच आज सकाळी पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांनी भेट देत पाहणी केली. काल (दि.१८) मंगळवारी २० मेंढ्या व ५ शेळ्या दगावल्या होत्या. आज (दि.१९) पुन्हा २१ मेंढ्या दगावल्याने मृत मेंढ्यांची संख्या ४१ तर शेळ्यांची संख्या ५ वर गेली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!