पाथर्डीत दोन अल्पवयीन मुलींचा विवाह रोखला, चाईल्ड लाईनची कामगिरी

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील देहजोवडे येथे दोन अल्पवयीन मुलींचा विवाह चाईल्ड लाईन संस्थेच्या पथकाने रोखला. दोन्ही मुली लहान असून त्या शाळेत जातात. त्यांच्या पालकांनी कायद्याचे उल्लंघन करून विवाह लावून देण्याचा प्रयत्न केला होता.

हा विवाह राखून पोलिसांनी पालकांना समज दिली आहे. मुलींचे वय वर्षे 18 झाल्यानंतर त्यांचा विवाह करण्याचे लेखी लिहुन घेतले असून याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रविवारी (दि.11) रोजी चाईल्डा लाईन संस्थेच्या 1098 या टेलफ्री क्रमांकावर तक्रार करण्यात आली होती. रुकनरवाडी येथे दोन अल्पवयीन मुलींचा विवाह होणार असल्याचे या पथकाला समजले होते. त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांना घटनेची माहिती दिली. त्यांना या गावातील सरपंच यांना बोलावुन दोन्ही मुलींचे कागदपत्रे तपासण्यात आले.

दोन्ही मुली अल्पवयीन असल्याचे समजताच पोलीस हेडकॉन्स्टेबल बारवकर यांच्यासह चाईल्ड लाईनचे अमोल धावडे, शाहीद शेख यांनी या बालविवाहास विरोध केला. मुलींचे 18 वर्षे वय पुर्ण होत नाही, तोवर विवाह करुन देणार नाही असे पालकांकडून लेखी घेण्यात आले.
जर मुली अल्पवयीन असतील तर त्यांचे विवाहाचे शारिरीक व मानसिक वय नसते. त्यामुळे पालकांनी अशा विवाहांना खतपाणी घालणे चुक आहे. यासाठी गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी जानजागृतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जर अशा प्रकारे जिल्ह्यात कोठे बालविवाह होत असेल तर 1098 या नंबरवर फोन करुन कळवावे असे आवाहन चाईल्ड लाईनच्या समन्वयक प्राची सोनवणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*