​ पावसामुळे पाथर्डी खरवंडी राज्य महामार्ग वाहतुक विस्कळीत

0

कोरडगाव, ता पाथर्डी  : काल रात्रीपासुन सुरु असलेला मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेले पुल वाहुन गेले असुन राष्ट्रीय महामार्ग 61 वरील वाहुतक ठप्प झाली आहे.

संबधीत मे. आर. बी. के. कंपनीकडुन वाहुत सुरळीत करण्यासाठी जेसीबीच्या सहय्याने प्रयत्न सुरु असुन तहसिलदार नामदेव पाटील व पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शनाखालील यांचे मार्गदर्शनखाली पर्यांयी वाहतुक वळवुन रस्ता दुरुस्तीचे काम सुरु आहे.

पाथर्डी खरंवडी राष्ट्रीय महामार्गावरील राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने गेल्या दोन वर्षापासुन सुरु असुन गेल्या दोन दिवसात झाालेल्या पासवसामुळे या कपंनीने तात्पुरत्या नळी टाकुन केलेली पर्यायी मार्ग आज पुर्ण वाहुन गेल्याने राष्ट्रीय मार्गावरील वाहतुक आज बंद आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील तनपुरवाडी येथील पुलाचा पर्यायी रस्ता पाण्यात वाहुन गेल्य़ाने चार तास वाहतुक बंद होती.

तहसीलदार नामदेव पाटील, पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी तातडीने उपाययोजना करुन रस्ता तयार केला व वाहतुक दुपारनंतर सुरळीत झाली.

शनिवारी रात्री सततधार पावसाला सुरुवात झाली.रविवारी पहाटपासुनच पावसाने जोर धरला होता.

LEAVE A REPLY

*