पाथर्डीत भाजपाची मुसंडी

0

तिसगाव काँग्रेसला तर कोरडगाव आघाडीकडे

पाथर्डी (प्रतिनिधी) – तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींचे निकाल काल दुपारी जाहीर झाले. तहसील कार्यालयाच्या आवारात मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पडली. सरपंच पदासाठीच्या स्वतंत्र निवडणुकीने ग्रामपंचायत निवडणुकांना वेगळेच महत्त्व प्राप्त झाले असून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून निवडीचे प्रमाणपत्र घेताना जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तालुक्यातील अकरा पैकी नऊ ग्रामपंचायतींमध्ये भाजपने मुसंडी मारली. तिसगावमध्ये काँग्रेस तर कोरडगावमध्ये स्थानिक आघाडीला बहुमत मिळाले.
सविस्तर निकाल असा- तिसगाव- सरपंच काशिनाथ लवांडे (1899) सदस्य- मनीषा नरवडे (398), इलियास शेख (389), नंदकुमार लोखंडे (242), अर्षद शेख (232), शबाना पठाण (318), फिरोज पठाण (345), सिंधू रांधवणे (272), लालखा पठाण (268), अमोल वाकळे (227), हिराबाई जवणे (282), शहीदा तांबोळी (193), अंबादास शिंदे (280, चिठ्ठी टाकून), संगीता वाघमारे (350), सुरेखा लवांडे (347), अविनाश नरवडे (190), भाऊसाहेब लवांडे (358), स्वाती ससाणे (231).
भालगाव- सरपंच मनोरमा खेडकर (1247), सदस्य- अंबादास खेडकर (330), केशव कासुळे (466), संजीवनी खेडकर (307), वसंत खेडकर (317), कुसूम खेडकर (293), संगीता खेडकर (276), पोपट रोकडे (306), सरिता सानप (208), कामिनी खेडकर (228), अशोक खेडकर (142), आशाबाई सुपेकर (164), रामभाऊ सुपेकर (237), सत्यशील खरमाटे (238).
मोहरी- सरपंच कल्पजीत डोईफोडे (890), सदस्य- आजीनाथ डोईफोडे (420), अयुबखान शेख (410), अलका नरोटे (415), रोहीदास खटके (281), लंका राजगुरू (308), लता सुसलारे (280), अशोक वाघमोडे (324), जनाबाई ठोंबरे (356), शकुंतला नरोटे (341).
जिरेवाडी -सरपंच उमाजी पवार (615), सदस्य- राजेंद्र आंधळे (186), सुमन खेडकर (152), राजेंद्र गहिनीनाथ आंधळे (186), सुनील आंधळे (198), सुरेखा बडे (227), सुमन आंधळे व संगीता पवळे दोघीही बिनविरोध.
निवडुंगे- सरपंच शोभा कोलते (661), सदस्य- संदीप मरकड (462), फारूक शेख (403), सुनंदा मरकड (318), आसाराम ससे (301), सविता घोडके (391), नंदा ससे (396), मयर चव्हाण (372), मायावती साळवे (361), सुवर्णा मरकड (बिनविरोध).
कोल्हार- सरपंच- शोभा पालवे (495), कर्ण जावळे (244), मीरा डमाळे (223), सुमन गर्जे (194), आदिनाथ पालवे (357), हौसाबाई पालवे (366), लता पालवे (346), अनिता नेटके (299), कारभारी गर्जे (304), गीतांजली पालवे (269). वडगाव- सरपंच- रंजना धनवे (639), सदस्य- रवींद्र ढाकणे (250), रावसाहेब ढाकणे (219), सोनू ढाकणे (237), बाबासाहेब पंडागळे (282), मीनाक्षी गरड (309), मंगल पांगरे (291), उद्धव नागरगोजे (363), सुरेखा बडे (373), सरस्वती बडे (381). कोळसांगवी- सरपंच- वसंत पेटारे (378), सदस्य- सिंधू घुले (129), पंचफुला घुले (77), सुरेखा फुंदे (165), अलका कुसळकर (146), विजय कुसळकर, संतोष पेटारे व संतोष धनवडे (तिघेही बिनविरोध). सोनोशी- सरपंच-विष्णू दौंड (138), सदस्य सुनंदा काकडे (59), गीता दौंड, अलका काकडे, विष्णू दौंड, अनिता दौंड, शोभा चौधर, विक्रम ससाणे, केशव दौंड, सुनीता वाघमारे (सर्व बिनविरोध).
तिसगाव व कोळसांगवी येथील दोन उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने पाच वर्षांची लहान मुलगी सर्वज्ञा माळी हिच्या हाताने चिठ्ठी टाकून विजयी उमेदवारांची नावे काढण्यात आली. मतमोजणी प्रक्रिया दुपारी दोन वाजता पूर्ण झाली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी साजरी करत आनंद व्यक्त केला.प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी सर्व विजयी उमेदवारांना नोटिसा बजावून मिरवणुका व सभांना बंदी घातली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार नामदेव पाटील यांनी चोख काम बजावले. तर पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी शेंडे, भगवान सानप, धर्मराज दहिफळे, राहुल खेडकर, भगवान पालवे, तांदळे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.

 

LEAVE A REPLY

*