Type to search

Featured सार्वमत

पाथर्डीतील रांजणी येथील चारा छावणीत दोन जनावरे दगावली

Share
पाथर्डी ( प्रतिनिधी)- रांजणी येथील छावणीतील दोन गायींचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. पाच जनावरांना वाचविण्यात पशुसंवर्धन अधिकार्‍यांना यश आले आहे. मृत गायींचे शवविच्छेदन करून मांसाचे नमुने पुणे येथील पशुवैद्यकीय प्रयोग शाळेत पाठविले आहेत. दुष्काळात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

छावणीतील कौसल्या साळुंके,(चार जनावरे), महादेव भताने (एक), आशा घोडके(एक) व बजाबा आव्हाड (एक) अशा सात जनावरांना पाच दिवसापूर्वी विषबाधा झाली होती. पाथर्डी येथील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. जगदीश पालवे, पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल ढाकणे यांनी रांजणी येथील छावणीला भेट दिली. सातही जनावरांवर उपचार केले. विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत असला तरीही नेमके कारण समजलेले नाही.

पाच जनावरे मात्र आता एकदम बरे आहेत. बुधवारी रात्री एक व गुरुवारी सकाळी एक अशा दोन गायी मृत झाल्या आहेत.तहसीलदार नामदेव पाटील यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल ढाकणे यांना शवविच्छेदन करण्याच्या सूचना केल्या. डॉ. ढाकणे यांनी गुरुवारी शवविच्छेदन केले. गायींचे मांस व रक्ताचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहेत. चार दिवसांत पुणे येथील अहवाल आल्यानंतरच मृत्युचे खरे कारण समोर येईल असे डॉ.ढाकणे यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी अहमदनगर येथील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनिल तुंभारे व त्यांच्या पथकाने रांजणी येथे भेट देऊन जनावरांची तपासणी करुन उपचार केले होते.तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. जगदिश पालवे यांनीही विषेश प्रयत्न केले होते. पशुवैद्यकिय अधिकार्‍यांचे पथक राजंणी येथे थांबूनच होते. शेतकर्‍यांना मृत जनावरांची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!