Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देवळा : खड्ड्यांचे साम्राज्य असलेल्या विंचूर-प्रकाशा महामार्गावरून मुख्यमंत्र्यांचा होणार प्रवास

Share

देवळा | प्रतिनिधी 

उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आज येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विंचूर प्रकाश महामार्गावरील खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सटाण्यात तीन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे चांदवड पर्यंतचा प्रवास मुख्यमंत्री देवळा मार्गे वाहनाने करणार असल्याचे समजते.

एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार हजारो किलोमीटरचे रस्ते तयार केल्याचा दावा ठोकत आहेत. तर दुसरीकडे दोन राज्यांना जोडणाऱ्या विंचूर प्रकाशा महामार्गावर ‘रस्त्यात खड्डे की, खड्ड्यांत रस्ते’  अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकेरी वाहतूक असलेल्या या महामार्गावर नियमित अपघात होत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सायंकाळी चार वाजता मुख्यमंत्री सटाणा येथे हेलीकॉप्टरने येतील, त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा चांदवडपर्यंतचा ३५ किलोमीटरचा प्रवास हा देवळा मार्गे वाहनाने होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विंचूर प्रकाशा महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून प्रशासानाने खड्डे बुजवण्याची कुठलीही मोहीम हाती घेतलेली दिसून येत नाही. रस्त्यावर जवळपास ३ फुटांपेक्षा अधिक खोलीचे खड्डे पडले आहेत.

रस्ता अनोळखी असलेल्या वाहनधारकांना जीव मुठीत धरून याठिकाणी प्रवास करावा लागतो. भावडबारी ते देवळा अपघात प्रवण क्षेत्र आहे. नियमित याठिकाणी अपघात होत असतात. महामार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलकांची वानवा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आजच्या दौऱ्यात खड्ड्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!