Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : ‘देश सेवा ही मेरे जीवन का अंतिम लक्ष्य’; 333 तोफखाना प्रशिक्षणार्थीं देश सेवेत दाखल

Share

नाशिक । प्रतिनिधी

आर्टिलरी तोफखाना केंद्राचे ४२ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३३३ जवानांचा दीक्षांत समारंभ मेजर जनरल पी. रमेश यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. भावी जवानांनी त्यांना शिस्तबद्ध संचलन करुन सलामी दिली. उत्कृष्ट जवान अमोल अण्णा वानखेडे (रा. जालना) याच्यासह विविध यशस्वी जवानांना पदक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना पी. रमेश म्हणाले की, तुम्ही इथे आज असण्यामागे सर्वात मोठा हात तुमच्या आई वडिलांनसह तुमच्या शिक्षकांचा आहे. त्यांच्या योग्य मार्गदर्शना मुळेच तुम्ही भारतीय तोफखाण्यात दाखल होऊ शकला आहात. मी त्यांना धन्यवाद देवू इच्छितो. तुम्ही खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. आता देशाची सेवा करणार आहेत.

तुमच्यातील अनेकांनी लहानपणापासून देश सेवेच स्वप्न पाहिलं आहे त्यांना मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो. तुमच्या अंगावर असलेली वर्दी इज्जतीने भरली आहे. हि इज्जत पूर्वजांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन मिळवली आहे. भविष्यात तुम्ही कोणतेही काम करताना याचे भान जरूर ठेवा.

आज पासून तुमच्या आसपासच्या लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्ट्कोन बदलणार आहे. यामुळे तुमची जबाबदारी अधिकच वाढते. तुम्ही सर्व आव्हानांना सामोरे जाल यात काही शंका नाही. हा सर्व धर्मियांचा हा देश आहे. आयुष्यात एक ध्येय ठेवा, ते पूर्ण करण्यासाठी सर्वस्व अर्पण करा. वेळ एकदा गेल्यावर परत येत नाही. धैर्य ठेवा, काही तरी करण्याचे वेड बाळगा. जोश व होश ठेवा, तंदुरस्त रहा, असा मौलीक सल्ला त्यांनी दिला.

दरम्यान, ३३३ नवसैनिकांच्या आई-वडिलांना मेजर जनरल पी. रमेश यांच्या हस्ते ‘गौरव पदक’ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित नातलगांनचे डोळे पाणावले होते.

या निवडक प्रशिक्षणार्थीचा झाला सन्मान

परेड कमांडर अमोल अण्णा वानखेडे (बेस्ट इन ड्रील), अजीत कुमार (उत्कृष्ट तंत्रज्ञ), प्रतिक के. एस (अष्टपैलू), दीपक यादव (तंत्रज्ञ), हरिकेश (रेडीओ ऑपरेटर), रिषभ दुबे (उत्कृष्ट गनर), श्रीजीत ए. एस (वाहनचालक), चिन्मया प्रधान (उत्कृष्ट शेफ) यांनी उत्तम कामगिरीबद्दल सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, पदक देवून सन्मानित करण्यात आले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!