Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशआता ईएमआयवर करा विमान प्रवास, अशी आहे योजना

आता ईएमआयवर करा विमान प्रवास, अशी आहे योजना

नवी दिल्ली.

स्पाइसजेट (SpiceJet) ने विमान प्रवाशांसाठी नवीन योजना आणली आहे. या योजनेमुळे विमान प्रवासाचे शुल्क ईएमआयने (EMI)भरण्याचा विकल्प ठेवला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी क्रेडीट किंवा डेबिट कार्डचे कोणतेही डिटेल्स द्यावे लागणार नाही.

- Advertisement -

माधुरी भाड्याच्या घरात राहणार, महिन्याच्या भाड्यात तुमचे स्वत:चे घर होणार

स्पाइसजेट (SpiceJet) ने विमान प्रवाशांसाठी आणलेल्या योजनेत 3, 6 किंवा 12 हप्तांमध्ये (Air Ticket in Installments) तिकिटाचे शुल्क भरता येणार आहे. कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता (व्याजा शिवाय) 3 महिन्याचा ईएमआय(EMI) घेता येणार आहे.

काय आहे योजना?

ईएमआय योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाश्यांना पॅन नंबर (PAN), आधार नंबर (Aadhaar) किंबा व्हिआयडी (VID)ची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच ही माहिती पासवर्डने व्हेरिफाय करावी लागणार आहे. ग्राहकास आपल्या यूपीआय आयडीने पहिले ईएमआय द्यावे लागणार आहे. त्यानंतरची ईएमआय त्याच यूपीआई आयडीने कपात होणार आहे. स्पाइसजेट स्पष्ट केले की, ईएमआय योजनेच्या लाभ घेण्यासाठी कोणतेही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचे डिटेल्‍स द्यावे लागणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या