Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

दौंड-मनमाड मार्गावरील पॅसेंजरसह पंढरपूर एक्सप्रेस चार महिने बंद

Share

आषाढी एकादशीमुळे नऊ दिवस गाड्या सुरु राहणार

शिर्डी (प्रतिनिधी) – मनमाड-दौंड रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे सर्व पॅसेजंर रेल्वे गाड्या तसेच पंढरपूरसह साईनगरी मुंबई फास्ट पॅसेंजर तब्बल चार महिने बंद राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय प्रबंधकांनी पत्रकारद्वारे दिली आहे.

मध्य रेल्वे विभागीय सोलापूर विभागाकडून नुकतेच एक पत्रक काढण्यात आले आहे. यात गाडी नं. 51422 निजामाबाद-पुणे व 51421 पुणे-निजामाबाद पॅसेंजर, 51433 व 51434 निजामाबाद पॅसेंजर 57515 व 57516 नांदेड पॅसेजर, 51033 व 51034 साईनगरी- मुंबई फास्ट पॅसेजंर या रेल्वे गाड्य 15 जून ते 25 सप्टेंबर 2019 पर्यंत बंद राहणार आहेत. तसेच आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर वारकर्‍यांचे हाल होवू नये म्हणून 6 जुलै व पुन्हा 15 जुलै या दरम्यान या गाड्या नऊ दिवसासाठी सुरु राहणार आहेत. त्यानंतर पुन्हा 25 सप्टेंबरपर्यंत या सगळ्या रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत.

मनमाड-दौंड या मार्गावरील दुहेरीकरणाचे काम जोरात सुरु असून ते लवकरात लवकर पुर्ण व्हावे म्हणून या रेल्वे गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर 11001 व 11002 या दोन रेल्वे गाड्या 7 जुलै, 9 जुलै 11 जुलै व 14 जुलै हे चार दिवस सुरु राहणार आहेत. तसेच 71414 व 71415 या दोन गाड्या 6 जुलै ते 14 जुलै या दरम्यान सुरु राहणार आहेत.
15 जून ते 25 सप्टेंबर 2019 दरप्यान रेल्वेने प्रवास करणार्‍या प्रवाशांचे हाल होणार असून प्रवाशांनी दुहेरीकरण होईपर्यंत रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रबंधक सोलापूर विभाग यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!