Type to search

Featured सार्वमत

नगर: प्रवासी वाहतुकीवरून शिवीगाळ, हाणामारी

Share

बसस्थानक परिसरातील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी) – स्वास्तिक चौकातील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर अवैध प्रवाशी वाहतूक करणार्‍यांमध्ये हाणामारी झाली. मंगळवारी (दि.17) सकाळी 11 वाजता ही घटना घडली.

याप्रकरणी सागर दिनेश बिनवडे, कैलास नाना लोंढे, राहूल अशोक पंडित, शंकर अशोक पंडित, अक्षय (पूर्ण नाव माहित नाही. रा. काटवन) संतोष टांगळ (पूर्ण नाव माहित नाही. रा. कोठला) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, स्वास्तिक चौकातील बसस्थानकासमोर अवैध प्रवासी वाहतूक करू नका, अशा सूचना पोलिस व एसटी महामंडळाकडून वारंवार दिलेल्या आहेत. मंगळवारी सकाळी बसस्थानकाच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वारासमोर अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍यांमध्ये शिवीगाळ व हाणामारी सुरु होती.

हाणामारीची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन काहींना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी सागर दुशिंगे यांच्या फिर्यादीवरून 7 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक चव्हाण करीत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!