Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमांडवा जेट्टीजवळ प्रवासी बसला अपघात; ८८ प्रवासी बालंबाल बचावले

मांडवा जेट्टीजवळ प्रवासी बसला अपघात; ८८ प्रवासी बालंबाल बचावले

मुंबई : आज सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास एका प्रवासी बोटला अपघात झाला. अपघातात सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. बोटमध्ये एकूण ८८ प्रवासी होते. सर्वजण सुखरूप आहेत.

अधिक माहिती अशी की, मांडवा  पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या दरम्यान चालणारी अजिंठा प्रवासी बोट 88 प्रवाशी घेऊन मांडवा जेट्टीपासून 1 किलोमीटर अंतरावर गेली होती.

- Advertisement -

अचानक बोट बुडू लागल्याने प्रवासी पुरुष, महिला व लहान मुले यांनी घाबरून आरडाओरड सुरु केली. याच वेळी सागरी गस्तीवर निघालेल्या रायगड जिल्हा पोलीस दलातील सद्गुरू कृपा बोटी वरील पोलीस कर्मचारी प्रशांत घरत यांनी ट्रॉलर वरील तांडेल व खलाशी यांच्या मदतीने बुडणाऱ्या प्रवाशी बोटींजवळ त्वरित पोहचत मदतकार्या केले.

या घटनेत जवळपास 88 पुरुष, महिला व बालके यांचा जीव वाचवून त्यांना पोलीस गस्तीवरील नौकेच्या सहाय्याने जेट्टीवर सुखरूप पोहोचविण्यात आले.

सदर दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसुन सुटका झालेल्या सर्व प्रवाशी यांनी व पोलीस अधीक्षक रायगड यांनी पोलीस कर्मचारी घरत यांची कार्यतत्परता, निर्णय क्षमता व धाडसाचे कौतुक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या