स्पंदन फाउंडेशनचा विहीगाव परिक्षेत्रात झाडे लागवड उपक्रमात सहभाग

0

महाराष्ट्र शासन वन विभाग राबवीत असलेल्या ४ कोटि च्या वृक्ष लागवडिच्या कार्यक्रमात ह्याही वर्षी स्पंदन फाउंडेशनने सहभाग नोंदवित विहिगांव वनपरिक्षेत्रात वृक्षलागवड केली.

विहिगांव परिक्षेत्रात ५०००० वृक्ष लागवड करण्यात येत आहे. त्यात स्पंदनने सहभाग घेतला होता. विहिगांव येथील दांड गावच्या बाजूला असलेल्या जंगलात स्पंदन फाउंडेशनने वृक्षारोपण केले.

त्यांना विहिगांव वनपरिक्षेत्र अधिकारी. बागराव सर ह्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कोणत्या प्रकारची झाडे आपन लावत आहोत त्यांचा उपयोग काय इत्यादी माहिती देखील त्यांनी सदस्यांना दिली.

‘महाराष्ट्र शासनाकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात प्रामुख्याने साग, मोह, आवळा, जांभुळ यासह बारा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन अतिशय चांगला उपक्रम राबवीत आहे त्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. काल कार्यालयात वृक्षलागवड केल्यानंतर आज पुन्हा येथे वृक्ष लागवड करण्यास मिळाले. असे नंदुरबारचे उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले म्हणाले.

आमच्या वनपरिक्षेत्रात ५०००० झाडे लावण्यात येत असून ह्या कार्यात अनेक सामाजिक संस्था, शाळा- महाविद्यालये ह्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर भेटत असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी नरहरी बागराव यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

*