Type to search

जळगाव

शिवशक्ती बहुउद्देशिय संस्थेने केला विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

Share

पारोळा (श प्र) –

तालुक्यातील बहादरपूर येथील नेहमीच समाजाभिमुख विविध उपक्रम राबवित असलेली श्रीक्षेत्र शिवशक्ती बहुउद्देशिय संस्थेने गोकुळ अष्टमी निमित्ताने समाजात विविध क्षेत्रात कर्तव्यपणे सेवा देणारे एकुण पस्तीस जणांचा गौरव सोहळा नुकताच बहादरपुर येथे झाला.

यावेऴी अध्यक्षस्थानी राजपुत संघटनेचे राष्टीय पदाधिकारी बाळासाहेब पाटील होते. तर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता धुळे पी.के.सोनार, आचार्य के.बी.रणधीर, गटशिक्षणाधिकारी सी.एम.चौधरी, आशा गृपचे अध्यक्ष भुपेंद्र मराठे, माजी ग.स.संचालक व्ही.एम.पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, वाँटरमन, तलाठी, मंडळ अधिकारी, एरंडोल नायब तहसिलदार एस.पी.शिरसाठ, पोलीस पाटील बहादरपुर, कोतवाल, माजी सरपंच, नुतन शिक्षण संस्था अध्यक्ष उमेश वैद्य, राज्य उपाध्यक्ष गिरीष वाणी, कार्याध्यक्ष ग.स.सोसायटी लोकमान्य गट गुणवंतराव पाटील, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्खाध्यापक मनवंतराव साळुंखे, पत्रकार योगेश पाटील, संजय पाटील, योगेश चौधरी, सेवानिवृत्त जेष्ठ संघाचे पदाधिकारी, जगदीश आफ्रे यांनी आपल्या क्षेत्रात चांगली कामगिरी केल्याने त्यांचा गौरव संस्थेचे संस्थापक आचार्य के बी रणधीर, अध्यक्ष शैला रणधीर, सागर रणधीर यांचेसह कार्यकारणी सदस्यांनी केला.

सत्काराचा निमित्ताने आचार्य रणधीर यांचा कार्याचा गौरव आचार्य के.बी.रणधीर हे गेल्या 35 ते 40 वर्षापासुन अविरतपणे कुठलाही मोबदला न घेता निस्वार्थपणे समाजात व्यसनमुक्ती व पाणीस्रोत हे कार्य करित असल्याने सत्काराचा निमित्ताने त्यांचा गौरव मान्यवरांचा हस्ते करण्यात आला.

अनेकांनी त्यांच्या कार्याबाबत अनुभव कथन करुन समाजात अशी बोटावर मोजण्या इतकी माणसे आहेत कि त्यांनी समाजकार्यात आपले जीवन व्यतीत केले आहे. त्यात आचार्य के बी रणधीर यांचे नाव आदराने सांगता येईल ही तालुका वासियांसाठी अभिमानाची बाब आहे.

यावेळी सत्कार्थींनी संस्थेने केलेल्या गौरवाचे आभार व्यक्त करित संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले. सुत्रसंचालन भगवान चौधरी तर आभार एम.पी.अहीरराव यांनी मानले. यशस्वीतेसाठी, सागर रणधीर, राजेंद्र चौधरी, माधवराव विसपुते,  धिकराव देशमुख, जयश्री सोनार, कल्पना देशमुख, संगिता चौधरी, नरेंद्र सोनार, शुभम चौधरी, वैशाली सोनार, आदीती सोनार यांनी सहकार्य केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!