Type to search

जळगाव धुळे नंदुरबार

मातीचे घर कोसळून सहा जण दाबले जाऊन गंभीर जखमी : पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील घटना

Share

पारोळा- तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथे दि.२० रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसाने गावातील मातीचे घराचे चार चष्मे पडून एकाच कुटुंबातील सहाजण दाबले जाऊन गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक २१ रोजी सकाळी ११:३० वाजता घडली.

तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडल्याने शेवगे बुद्रुक येथील पाटील कुटुंबीय हे आज शेतात वाफ नसल्याने ग.भा. कल्‍पनाबाई चंद्रकांत पाटील वय ४९, सागर अशोक पाटील वय १६, कविता वेदांत पाटील वय २४, ललित बाळू पाटील २०, वाल्मीक चंद्रकांत पाटील २२, छबाबाई अर्जुन पाटील ७० असे घरात बसलेले असताना अचानक सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास वाल्मिक पाटील यांच्या घराचे मागच्या बाजूचे चार चष्मे मातीचे घर कोसळल्याने त्यात वरील सहा जण दाबले गेले.

मोठा आवाज झाल्याने गावात पळापळ सुरू होऊन मिळेल त्या साहित्याने गावातील तरुण धनंजय भिला पाटील, आशिष शालीक पाटील, शरद अंकुश पाटील, सुनील भिला पाटील आशिष भटू पाटील, साहिल सुनील पाटील, नामदेव शेनपडु पाटील, सचिन दिलीप पाटील, दिलीप दशरथ पाटील, भूषण दिलीप पाटील, विजय गोकुळ पाटील, अनिल काशिनाथ पाटील, समाधान रवींद्र पाटील, गोकुळ जगन्नाथ पाटील, ज्ञानेश्वर देविदास पाटील आदी तरुणांनी मातीचा ढिगारा उपसत जखमींना बाहेर काढले १०८ रुग्णवाहिकेत डॉक्टर सुनील पारोचे प्रमोद सूर्यवंशी यांनी पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले.

ही दुर्दैवी घटना रात्री घडली असती तर मोठा अनर्थ झाला असता परंतु दिवस असल्याने गावातील तरुणांनी धैर्य दाखवत ढिगारा उपसून सहाही जणांचे प्राण वाचविले हे विशेष, त्या सहाजणांपैकी कल्पना चंद्रकांत पाटील, ललित बाळु पाटील, वाल्मीक चंद्रकांत पाटील या गंभीर जखमींना प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ धुळे येथे हलवण्यात आले आहे. तर इतर जखमींवर डॉक्टर योगेश साळुंखे, परिचारिका सरला पवार, डॉ.सौ.अंजली पाटील, दीपक सोनार, राजू वानखेडे आदींनी उपचार केले. यावेळी तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे, हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील, अनिल वाघ, मंडळाधिकारी पी.ए.पाटील, प्रदीप गांगुर्डे, शहर तलाठी निशिकांत पाटील, भैय्या निकम, बी.टी.पाटील, आदींनी भेटी दिल्यात व जखमींची विचारपूस केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!