Type to search

Breaking News जळगाव राजकीय

शरद पवार यांची उद्या पारोळ्यात सभा

Share

पारोळा (प्रतिनिधी) –

आज विधानसभा निवडणूकीचा उमेदवार माघारीचा शेवटचा दिवस असून काही वेळातच म्हणजे (३ वाजेला) माघारीची वेळ संपेल. त्यानंतरच कोणत्या मतदार संघ्यात किती उमेदवार रिंगणात असतील हे चित्र स्पस्ट होईल.

उद्यापासून प्रचाराची खरी रंगत सर्वत्र पहावयास मिळेल. जिल्ह्यात यावेळच्या निवडणूकीसाठी उमेदवारी मिळविण्यापासून कसरत सुरू झाली आहे. मुक्ताईनगरकडे तर साऱ्या राज्याचे लक्ष लागून होते. त्याचप्रमाणे चोपडा, जळगाव ग्रामीण, अमळनेर आणि पारोळा या मतदार संघात जरा जास्तच घडामोडी घडल्या. त्यामुळे यंदा स्टार प्रचारकांच्या सभाही तशाच गाजणार असल्याचे बोलले जात आहे.

उद्या दि.८ रोजी पारोळा येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी-काँग्रेस तर्फे आ.डॉ.सतीश पाटील निवडणूक लढवत आहेत. पक्षांतर नाट्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी उद्याची पवार साहेबांची सभा महत्वाची ठरणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!