Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव दिनविशेष

सर्पमित्रांनी दिले हजारो सापांना जीवदान : पारोळा तालुक्यातील सर्पमित्रांची कामगिरी

Share

नागपंचमी विशेष

योगेश पाटील

पारोळा –

येथील सर्पमित्र गृप २०११ पासून काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी १७२९ विषारी व बिन विषारी सापांना जीवन दान दिले आहे.

त्यांनी एकही सर्पास जखमी न होता पारोळा वन विभागाचे प्रमुख अधिकारी आर.एस.दसरे (वन क्षेत्रपाल) यांचे मार्गदर्शनाखाली जगदीश पाटील,
दिपक पाटील, श्रीमती शिंदे, श्रीमती गायकवाड, श्रीमती मोरे, श्रीमती साळी यांच्या सोबत घेऊन सर्प मित्र यांनी आतापर्यंत १७२९ सापांना पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आले आहे.

तसेच वन्यजीव व सर्प जखमी झालेले असतील तर त्यांना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक पाटील यांच्याकडून उपचार व देखरेख करून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले जाते.

सर्पदंश व प्रतिबंध

शेतकरी, मंजूरांनी पूर्ण कपडे व गम बूट घालावेत, गवत कापताना अगोदर गवतातून काठी फिरवावी. रात्रीच्यावेळी बॅटरी व काठीचा वापर करावा.
भिंतीस चिटकून बिछाना टाकू नये, शक्यतो खाट व मच्छरदाणीचा वापर करावा. उंदरांवर नियंत्रण ठेवावे. घराभोवती असलेल्या झाडांच्या फांद्या घर खिडक्यांना स्पर्श करणाऱ्या नसाव्यात. घराजवळ पाण्याचे डबके, उकीरडा असू नये. घरातील अडगळीच्या जागा काळजीपूर्वक वापराव्यात.

साप चावल्यास प्रथमोपचार

रूग्णास मोकळ्या जागेत घेणे, रूग्णास घाबरू न देता धीर द्या, रूग्णास पळू देऊ नका, हालचाल करू देऊ नका. दंश झालेला भाग हृदयाच्या

पातळीच्या खाली असावा. हाताला दंश असल्यास दंडाला व पायाला दंश असल्यास मांडीला आवळपट्टी बांधावी. रूग्णास त्वरीत जवळच्या रूग्णालयात दाखल करावे.

जर कोणाला वन्यजीव व सर्प दिसले तर त्यांना न मारता सर्प मित्र ग्रुपला कळवा

मयूर पाठक ९९७०७०१५२३,
प्रविण जगताप ९३२५४४०७४४,
भुषण पाटील ९५६१९५४९००,
निंबा मराठे ९४२०६०४०७५,
यांच्याशी संपर्क करावा.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!