Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

पारोळा : हिरापूर फाट्याजवळ अपघात; शिरसोली प्र.बो.येथील दाम्पत्य ठार

Share

महामार्गावरील खड्ड्यांनी घेतले पुन्हा दोन जीव

पारोळा (श. प्र.) –

पारोळा तालुक्यातील म्हसवे शिवारातील महामार्ग सहावरील हिरापूर फाट्यानजीक ट्रकने खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात शिरसोली प्र.बो. (ता.जळगाव) येथील मधुकर महारु पाटील (४०) व त्यांची पत्नी गोडबाई मधुकर पाटील (३६) हे हिरो एच एफ एम एच १९-सी एम-९१२५ वर नातेवाईकांचे श्त्रक्रिया झाल्याने हिरापूर ता.पारोळा येथे जात असताना ट्रक चालकाने धडक दिल्याने पाटील दाम्पत्य पुढच्या चाकात अडकून जागीच मरण पावले.

डोक्यातले हेल्पेट डोक्यातच राहीले

अपघात प्रसंगी डोक्यात हेल्मेट नसले तर आपण म्हणतो हेल्मेट असते तर जीव वाचला असता. मात्र शिरसोली येथील अपघातात ठार झालेल्या मधुकर पाटील यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले होते. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकच्या पुढील चाकाखाली हे दाम्पत्य दाबले गेले. अपघात एवढा भयानक होता की, दोन्ही पती-पत्नीच्या पोटावर ट्रकचे चाक उभे होते. हा दुर्दैवी प्रसंग न बघण्यासारखा होता. मधुकर पाटील यांच्या डोक्यातील हेल्मेट शेवटी डोक्यातच राहीले.

धुळे – ते जळगाव महामार्गाची चाळण झालेली असून अनेक अपघात घडलेत अनेक निष्पाप बळी गेलेत, मात्र या महामार्ग अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना जाग येत नाही खासदारांनी सात दिवसात रस्त्याचे काम डांबर खडीने बुजले जाणार असल्याचे सांगितले होते. १२ दिवस उलटले तरीही खड्डे पुरण्यात आलेले नाहीत. अधिकारी लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करा. या खड्ड्यात जीव गेलेल्यांच्या मरणास कारणीभूत ठरल्याचे गुन्हे अधिकारी व लोकप्रतिनिधींवर दाखल करण्याची मागणी पारोळा तालुक्यातून होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!