Type to search

Breaking News आवर्जून वाचाच जळगाव

पारोळा : भोकरबारी धरणात फक्त ६५ टक्के जलसाठा

Share

पारोळा (श.प्र.) –

यावर्षी संपूर्ण राज्यात चांगला पाऊस झाला असून जिल्ह्यात अति पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ओला दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे.

अनेक वर्षांपासून कोरड्या ठाक पडलेल्या नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठी धरणे, पाझर तलाव, ओढे ओसंडून वाहत असून परतीच्या पावसाने तर कहरच केल्याने या पावसानंतर हतनुर, गिरणा, वाघुर, बोरी धरणाचे दरवाजे उघडावे लागले होते. जिल्ह्यातील सर्व तलावांमध्ये १०० टक्के जलसाठा झाला आहे. मात्र त्यास पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरण अपवाद आहे.

जिल्ह्यात भोकरबारी हे एकमेव असे धरण आहे की, त्यात आजमितीस ६५ टक्के जलसाठा आहे. तोही पावसाच्या पाण्याने नाही तर पारोळा तालुक्यातील म्हसवे पाझर तलावाच्या ओसांड्यातील पाटचारिद्वारे पाणी आणून हा ६५ टक्के जलसाठा जमा झाला आहे.

पारोळा तालुक्यातील धरणांमधील जलसाठा

म्हसवा ल.पा

पाणीपातळी – ४६.६४ मी.

पाणीसाठा- ३.४६३ द.ल.घ.मी.

टक्केवारी- १०० %

शिरसमणी ल.पा.

पाणीपातळी – २७४.६२ मी.

पाणीसाठा – १.५४० द.ल.घ.मी.

टक्केवारी- १०० %

पिंपळकोठा-भोलाने ल.पा.

पाणीपातळी – १९५.७० मी.

पाणीसाठा – २.०९२ दलघमी

टक्केवारी – १०० %

भोकरबारी म.प्र

पाणीपातळी – २३७.२० मी.

पाणीसाठा – ४.२७ दलघमी

टक्केवारी – ६५.३१ %

कंकराज ल.पा.

पाणीपातळी – २१७.४० मी.

पाणीसाठा – १.८८४ दलघमी

टक्केवारी – १०० %

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!