Type to search

जळगाव

पारोळ्यातील बालसंस्कार शिबिरात ४५०० विद्यार्थ्यांची नोंद

Share

पारोळा- अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार सेवा केंद्र, दिंडोरी प्रणित यांच्या वतिने व गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र आदरणीय नितीन भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाने बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागामार्फत एक दिवशीय जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड बालसंस्कार शिबिर २१ जुलै रोजी संपूर्ण तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये संपन्न झाले.

`संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर राष्ट्र टिकेल आणि राष्ट्र टिकले तरच देश टिकेल’ गुरुमाऊलींच्या या ब्रीद वाक्य प्रमाणे बालसंस्कार ही आज काळाची गरज बनली आहे म्हणून आदरणीय नितीन भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण भारतासह विदेशात देखील बाल संस्कार शिबिराचे वेळोवेळी आयोजन करण्यात येत आहे यात विद्यार्थ्यांकडून स्तोत्र मंत्र पठण करून म्हणजेच अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून त्यांच्यावर योग्य ते संस्कार केले जात आहेत जेणेकरून येणारी भावी पिढी ही सात्विक विचारांची असेल आणि यातुन सर्व गुण संपन्न असे नागरिक घडावेत या माध्यमातून तालुक्यातील बहुतांश शाळांनी या शिबिरात उस्फुर्त पणे सहभागी झाल्या या शिबिरा अंतर्गत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने विद्यार्थी – शिक्षक व सेवेकऱ्यांच्या सहकार्याने 900 झाडांचे वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन प्रतिज्ञा घेण्यात आली.

यात तालुक्यातिल साने गुरुजी प्राथमिक विद्यालय , बाल संस्कार प्राथमिक विद्यालय, ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय, एन.ई.एस.प्राथमिक विद्यालय, जय हिंद प्राथमिक विद्यालय, राजे संभाजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, व्यंकटेश नगर माध्यमिक विद्यालय, आयडल इंग्लिश मीडियम स्कूल, डॉ.व्ही.एम.जै

न प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, केशव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, ना.धो. महानोर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जि.प. प्राथमीक शाळा शिवरे, जि.प.प्राथमीक शाळा हिरापूर, माध्यमिक विद्यालय शिवरे, माध्यमिक विद्यालय वेल्हाणे, माध्यमिक विद्यालय सार्वे-बाबळे, माध्यमिक विद्यालय म्हसवे या सर्व शाळांनी आपला सहभाग नोंदवला या शिबिरास प्रामुख्याने शाळेचे संस्थापक अध्यक्ष यांनी शिबिर घेण्यास परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे व या शिबिरास सर्व शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हे शिबिर संपन्न होण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या आलेल्या बालसंस्कार प्रतिनिधींना जे सहकार्य केले त्यामुळेच हे भव्यदिव्य असे शिबीर संपन्न होण्यास मदत झाली म्हणून या सर्व गुरुजन वर्गांचे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने केंद्राचे बालसंस्कार प्रतिनिधी परेश सौपुरे यांनी आभार मानले.

ह्या संपुर्ण शिबिराचे नियोजन केंद्र प्रतिनिधी सौ वनमाला पाटील पाटील व बालसंस्कार प्रतिनिधी परेश सौपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यातील शाळांमध्ये एकाच वेळी राबवण्यात आले. तसेच शिबिर यशस्वी होण्यासाठी संस्था चालक मा.खासदार वसंतरावजी मोरे, मा. आमदार डा.सतीश पाटील, यु.एच.करोडपती, भैय्यासाहेब पवार, डॉ.शांताराम पाटील, समिर पाटील यांनी परवानगी देवून सहकार्य केले. तर सौ.वनमाला पाटील, परेश सौपुरे, सौ.वैशाली सावंत, सौ.शोभा साळुंखे, सौ.अर्चना जोशी, सौ.रुखमा ताई लोहार, वाणी ताई, पाटील ताई, सौ.माधुरी मेणे, श्री भामरे सर, श्री बडगुजर सर, नरेंद्र चौधरी, गुणवंत चौधरी, श्री चिंचोरे सर डॉ.राजेश पाटील, दिपक पाटील, निलेश पाटील, हरिष पाटील सर आदिंनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!