Type to search

जळगाव

पारोळा बाजार समितीत मंगळवार पासून भाजीपाला लिलाव सुरू होणार

Share

पारोळा (प्रतिनिधी)-

येथील बाजार समितीत शेतकऱ्यांकडून आलेल्या भाजीपाल्याचा लिलाव हा येत्या मंगळवार दि.२७ ऑगस्ट पासुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणार असल्याची माहिती येथील शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात दिली असुन बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी यानी वरील माहितीला दुजोरा दिला आहे.

दरम्यान येथील भाजी मार्केट व्यापारी व आडत दुकानदार यांनी स्थानिक शेतकऱ्यांना कोणतीही सुचना न देता पारोळा भाजीपाला मार्केट दि.२२ रोजी अचानक बेमुदत बंद ठेवले. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला मार्केटला आणला होता, मात्र भाजीपाल्याचा लिलाव न झाल्याने शेतकऱ्यांना तो भाजीपाला फेकावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी हे स्वत: विना कमिशनने माल हा बाजार समितीच्या आवारात दि.२७ ऑगस्ट पासुन विक्री करणार असल्याची माहिती आतुल नाना पाटील, नाना बळीराम चौधरी, नाना लोटन पाटील, संभाजी पाटील, महेंद्र माळी, चंदु पाटील, आबा पाटील, पुडलिक पाटील, संजय बुधा पाटील, दत्तु महाजन आदी शेतकऱ्यांनी लेखी स्वरुपात निवेदन दिले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा भाजीपाला लिलावास शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे मागणी केली असुन त्यांना जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती बाजार समिती सभापती अमोल पाटील यांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!