पारनेर : राष्ट्रवादीच्या दोन गटातच हल्लाबोल

0

बंडखोर अशोक सावंत, दीपक पवार व सुजित झावरे गटाची स्वतंत्र निवेदने

पारनेर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यभर सरकारच्या धोरणांविरोधात हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. मात्र पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेली गटबाजी पुन्हा एकदा पारनेर तहसीलवर हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून समोर आली आहे. सोमवारी (दि.27) रोजी दोन स्वतंत्र आंदोलनाने देशात एक असलेली राष्ट्रवादी पारनेर तालुक्यात मात्र दुभंगल्याचे चित्र आहे.
पारनेर तहसील कार्यालयात राष्ट्रवादीच्यावतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. सर्व शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, तसेच शेतकर्‍यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे, विजबिले सरसकट माफ करून कुणाचेही कनेक्शन कट न करता विज देण्यात यावी, कांदा आयात ताबडतोप बंद करण्यात यावी, कांदा उत्पादक शेतकर्‍यांना न्याय द्यावा, शेतीमालाला आधारभूत किंमत देण्यात यावी व शेतमाल खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, दुधास योग्य भाव देण्यात यावा,
शासनाकडून वाढत्या महागाईस आळा घालण्यात यावा, सुशिक्षीत बेरोजगार, शैक्षणिक पात्रता असणार्‍यांना जिल्ह्यामध्ये नोकर्‍या देण्यात याव्यात, शाळा कॉलेज मधील मुला-मुलींना बसची नियमित व वेळेत सेवा देण्यात यावी, विषारी औषधे फवारल्यामुळे बळी पडलेल्या शेतकर्‍यांच्या मुला-मुलींचे शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्यात यावी, पोलीस व इतर सरकारी भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी तसेच कायदा व सुव्यवस्था व राजकीय हेतुने कार्यकत्यांवर होणार्‍या कारवाईबाबत आदी मागण्या शासन स्थरावर योग्य तो पाठपुरावा करावी अन्यथा पुढील काळात उपोषण, रास्ता रोको अशा प्रकारे आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
औद्योगिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार यांच्या गटाने विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दत्तात्रय बाहुले व काथवटे यांच्याकडे दिले.
यावेळी शहर प्रमुख सोमनाथ वरखडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य भाऊसाहेब खोडदे, माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम रोहकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तुकाराम मते, बाबाजी भंडारी,
माजी उपाध्यक्ष इंद्रभान गाडेकर, माजी संचालक बाळासाहेब लामखडे, उमेश सोनवणे, विजय खंदारे, बाळासाहेब इकडे, एल.बी. खामकर, सुर्यभान कांडेकर, वैभव काळे, गणपत शेळके, अजिंक्य सावंत आदी उपस्थित होते.
तर सुजित झावरे यांच्या गटातील विद्यमान तालुकाध्यक्ष दादासाहेब पठारे, गंगाधर बेलकर, अरूण ठाणगे, शंकर नगरे, चंद्रकांत कुलकर्णी, दीपक नाईक, योगेश मते आदी उपस्थित होते.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांची द्विधा मनस्थिती –
तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र गट निर्माण झाल्याने नेत्यांच्या या गटबाजीने राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रामाणिक सर्वसामान्य कार्यकर्ते यामुळे द्विधा मनस्थितीत आहे. आजच्या आंदोलनात कार्यकर्त्यांच्या संख्येवरून चित्र स्पष्ट झाले. यामुळे राष्ट्रवादीचे तालुक्यातील भवितव्य टिकविण्यासाठी वरीष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*