पारनेरमध्ये कॉलेजसमोर प्रेमी युगुलाला चोप

0

पालकांचा आक्रमक पावित्रा

पारनेर (प्रतिनिधी) – शिक्षणासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाला वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने तरुणीच्या पालकांनी युवकाची यथेच्छ धुलाई केली. या युवतीलाही बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि.22) रोजी घडली आहे. कॉलेजच्या समोर घटना घडत असताना शिक्षकांसह बघ्यांनी गर्दी केली. मात्र सोडविण्यास कोणीही धजावले नसल्याने प्रेमीयुगुलाला पालकाच्या रोषाला सामोरे जावे लागले.
शहरातील महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवतीस एक मजनू भेटायला आला. सकाळी 10 वाजून 43 मिनिटांनी याची खबर युवतीच्या मामांना समजली, याअगोदरही वारंवार समजूनही ऐकत नसल्याने युवक दिसताच त्याची यथेच्छ धुलाई कॉलेजच्या प्रवेशद्वारावरच सुरू झाली.
परीक्षा सुरू असल्याने पेपर सुटल्यानंतर बघ्यांची एकच गर्दी उसळली. यात प्रवेशद्वाराच्या आतून शिक्षकही हा प्रकार पाहत होते. मात्र पालकाचा राग अनावर झाल्याचे पाहून कोणीही सोडविण्यास आले नाही. यात मात्र युवकाबरोबरच संबंधित युवतीलाही मारहाण झाल्याने सर्वच अवाक झाले.
यावर मात्र अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
पारनेरमध्ये हजारो युवक-युवती दररोज शिक्षणासाठी येत असतात. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार घडला होता. यातून टोळीयुध्दाचे प्रसंगही उद्भवले होते. कॉलेज परिसरातील गंभीर प्रकार टाळण्यासाठी कायमस्वरुपी पोलीस बंदोबस्ताची मागणी होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

*